Ad will apear here
Next
‘फर्स्ट टेक’ स्पर्धेत पुण्याचे चारुदत्त पांडे विजेते
देशभरातून दोन हजारपेक्षा जास्त कलाकृतींचा समावेश
चारुदत्त पांडे आपल्या कलाकृतीसह

अहमदाबाद : ‘फर्स्ट टेक’ या राष्ट्रीय पातळीवरील पेंटिंग, प्रिंट्स, सिरॅमिक व शिल्पकला क्षेत्रातील स्पर्धेत पुण्याच्या चारुदत्त पांडे यांनी पहिल्या दहा विजेत्यांमध्ये स्थान पटकावले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अंदाजे दोन हजार ३५० कलाकृतींपैकी १३० कलाकृतींची निवड प्रदर्शनासाठी करण्यात आली आणि त्यातून सर्वोत्कृष्ट दहा कलाकृतींची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली. त्यामध्ये चारुदत्त पांडे यांच्या अॅक्रेलिक पेंटिंगचा समावेश आहे. 

चारुदत्त पांडे यांची कलाकृती म्हणजे कॅनव्हासवर अॅक्रेलिक पेंटिंग असून, त्याचे शीर्षक ‘ब्रिदिंग’ असे आहे. ही कलाकृती अंतर्गत स्थलांतराची संकल्पना व मूलभूत गरजांमध्ये वाढ याविषयी आहे. जीवनाच्या धावपळीत स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास या पेंटिंगमध्ये चितारला आहे.

अबिर चॅरिटेबल ट्रस्टच्या सहयोगाने क्लॅरिसने अहमदाबाद येथे नुकतेच या वार्षिक उपक्रमाचे आयोजन केले होते. देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकार यामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी सादर केलेल्या कलाकृतींचे मूल्यमापन उमंग हुथीसिंग, सुबोध केरकर, ब्रिंदा मिल्लर, जयंती रबाडिया व वीर मुंशी या मान्यवर परीक्षकांनी केले.  

विजेत्यांना क्लॅरिसचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अर्जुन हंडा, अॅस्ट्रल पॉलिटेक्निक लि.चे व्यवस्थापकीय संचालक संदीप इंजिनीअर आणि ‘एबीआयआर’च्या संस्थापक रुबी जागृत यांच्या हस्ते अहमदाबाद येथे गौरवण्यात आले. ‘फर्स्ट टेक’ बरोबरच्या सहयोगाविषयी बोलताना, अर्जुन हंडा म्हणाले, ‘भारतात समकालीन कलेच्या बाबतीत प्रचंड गुणवत्ता आहे. मला कलेमध्ये रुची असल्याने अनेक उदयोन्मुख कलाकारांचे काम पाहण्याची संधी मिळाली. देशभर विपुल गुणवत्ता आहे आणि या कलाकारांना थोडे उत्तेजन व आणखी विकसित होण्यासाठी व्यासपीठाची आवश्यकता आहे. फर्स्ट टेकबरोबर असलेला सहयोग म्हणजे समकालीन कलाकारांना शाश्वत पद्धतीने योग्य व्यासपीठ उपलब्ध करण्याचा उपक्रम आहे.’

यंदाच्या स्पर्धेविषयी बोलताना, रुबी जागृत म्हणाल्या, ‘या वर्षी आम्हाला भारतातील अनेक शहरांतून भरघोस प्रतिसाद मिळाला. या वर्षी सादर करण्यात आलेल्या कलाकृतींमधील प्रोफेशनलिझम व सोफिस्टिकेशन यामध्येही वाढ झाली आहे. येत्या काही वर्षांतही हेच चित्र दिसून येईल, अशी अपेक्षा आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZSWCG
Similar Posts
पुण्याच्या ओंकार मोदगीचा लघुपट एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुणे : पुण्यातील पटकथालेखक व दिग्दर्शक ओंकार मोदगी याच्या ‘डोगमा’ या लघुचित्रपटाची लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या एशियन फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. गुरुवारी, १२ डिसेंबर रोजी लॉस एंजिलिसमध्ये हा लघुचित्रपट दाखवला जाणार आहे.
'इंटरनॅशनल फॅशन शो' साठी पुण्याच्या रोहित शिंदेची निवड पुणे : फिलिपीन्स येथे २४ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या इंटरनॅशनल फॅशन शोसाठी जगभरातून जवळपास तीस देशांतून मॉडेल्स सहभागी होत आहेत. या स्पर्धेसाठी भारतातून पुण्यातील रोहित शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
अमेरिकन सरोदवादक केन झुकरमन यांनी उलगडली कारकीर्द पुणे : गिटार वाजवत असताना आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा गंधही नसताना सरोदने घातलेली भुरळ, प्रथम सतार शिकण्यास केलेली सुरुवात आणि पुन्हा सरोदच्या शिक्षणाकडे वळलेले पाय आणि सरोदलाच वाहून घेण्याचा मनाने घेतलेला निर्णय… अमेरिकेतील प्रख्यात सरोदवादक केन झुकरमन यांनी आपला प्रवास ‘सवाई’च्या ‘अंतरंग’ कार्यक्रमात उलगडला
नऊ वर्षांचा चित्रकार ‘रेखाटे आईची महती’; त्याची जगभर कीर्ती ‘माय मदर अँड मदर्स इन नेबरहूड’ (माझी आई आणि शेजारपाजारच्या आया) या चित्राची सध्या विविध समाजमाध्यमांवर जगभर चर्चा आहे. त्याचं कारणही तसंच आहे. केरळमधल्या अनुजाथ सिंधू विनयलाल नावाच्या एका बालचित्रकारानं काढलेलं ते चित्र आहे. तो आता १४ वर्षांचा असला, तरी त्याने नऊ वर्षांचा असतानाच हे चित्र काढलं होतं

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language